जा जरा पुर्वेकडे !

वर्षभर लाभते हवामान कोरडे,

आटले तलाव विटली धरणे,

दुष्काळ तेव्हा तेथे पडे,

जा जरा पुर्वेकडे !


क्रोध निर्सगाचा नभ धारण करे,

ढगफुटी होऊनी थेंबही  वर्षले,

भरभरून वाहती नदी-नाले व ओहडे,

जा जरा पुर्वेकडे !


केले प्रदुषन अन् नभ मानवावर रुसे,

तुटती बांधारे शेतशिवारात पाणी घुसे,

अतिवृष्टीमुळे कापुस झाडावरच सडे,

जा जरा पुर्वेकडे !


बी-बियाने उसणे घेऊन शेतात त्याचा पेरले,

उन्हातान्हात घाम गाळूनी रान त्याने कसले,

त्याच शिवारात पाणी पाहुन शेतकरी माझा हा रडे,

जा जरा पुर्वेकडे !


आले कापुस पिकले सोयाबीन चेहरे त्यांचे हसरे,

पाप काय त्याचे सोयाबीनचे दर रातोरात घसरे,

लटकायचे असेल तर हाती का घ्यावे फावडे,

जा जरा पुर्वेकडे !


गेला तोंडातील घास कशी साजरी होईल दिवाळी,

विचार करुन परिवाराचा पचेल का रे पोळी,

भेटून आधार द्या त्यांना नाहीतर उचलावे लागतील मढे,

जा जरा पुर्वेकडे !


माजवले पाऊसाने स्वतःच्या तांडवाचे थैमान,

लटकलेली दोर पाहुन चेहरा लपवे तो सैतान,

जगाचा पोशिंदा तो, का रे मग तो रडे,

जा जरा पुर्वेकडे !


जिरलेही नाही पाणी थांबले अजुनही जिथे,

मायबाप हो सरकार जात नाही का तिथे,

विदर्भ ही माझा मराठवाडा ही माझा, मदतीचे हात करा रे पुढे,

जा जरा पुर्वेकडे !

             जा जरा पुर्वेकडे !





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments

  1. Very good Shivam 👍👍👏👏🙌🙌

    ReplyDelete
  2. मस्त!!!!✨

    ReplyDelete
  3. खुप सुंदर लिहलंय 👌🏻👌🏻🔥💯

    ReplyDelete
  4. 🥺 सत्य परिस्थितीवरील हृदयस्पर्शी भाष्य 🙌
    𝗮𝘄𝗲𝘀𝗼𝗺𝗲 𝗽𝗼𝗲𝗺👌👌

    ReplyDelete
  5. 𝗔𝗪𝗘𝗦𝗢𝗠𝗘 𝗣𝗢𝗘𝗠 👌👌
    🥺सत्य परिस्थितीवरील हृदयस्पर्शी भाष्य 🙌

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलयस !!👏👌👍

    ReplyDelete
  7. Awesome poem👏👌

    ReplyDelete
  8. सत्य परीस्थिती

    ReplyDelete

Post a Comment