सह्याद्रीच्या कुशीमधुन स्वत: सूर्य दाखवितो वाटा,
दुष्काळ मिटवत वाहतात कृष्णे-गोदावरीच्या लाटा,
निसर्गच असा लिहितोय तो वैषम्यीक कथा,
ऐका माझ्या महाराष्ट्राची अभिमानाने गाथा !
सप्तसिंधुच्या स्पर्शाने पवित्र होऊन रचली कहाणी,
पंढरीच्या दिशेने गुंजते माझ्या संतांची वाणी,
आई-भवाणीच्या चरणी नतमस्तक होतात माथा,
ऐका माझ्या महाराष्ट्राची उदात्तपणाने गाथा !
अन्यायाविरुद्ध छत्रपतींची तलवार माझ्या हाती,
स्वराज्याचे गुणगान गाणे माझीच मराठी माती,
महाराष्ट्रामुंळेच समृध्द झाल्या इतिहासातील कथा,
ऐका माझ्या महाराष्ट्राची अजिंक्य गाथा !
पश्चिमेस गिरीदूर्ग घेऊन उभाच आहे सह्याद्रीचा घाट,
दख्खनच्या पठाराने मांडला शत्रूच्या छाताडावरी थाट,
गनिमीकाव्याने निर्माण करतो शत्रूस आम्ही व्यथा,
ऐका माझ्या महाराष्ट्राची अजरामर ही गाथा !
पावन पुण्यभूमीला, आमच्या शूर-क्षत्रियांना करितो वंदन,
ह्याच वीरांच्या विचारांनी ह्या भूमीत फुलले नंदन,
पुरातणीय असली जरी, तरी संस्कृतीवरी आहे आस्था,
ऐका माझ्या महाराष्ट्राची अद्वितीय गाथा !
महाराष्ट्रात येताच क्षितिजही बाळगतो अभिमान,
जगा देतोय आम्ही बंधुते-समतेचे साहित्यातून दान,
स्वराज्याचे बीज पेरितो आम्ही सर्वथा,
ऐका माझ्या महाराष्ट्राची अभेद्य गाथा !
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Sir the poem that you have composed is very nice and proudfull for each and every maharashtrian I like it very much thanks for giving such a great inspiration 💯🤝
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete👍👍🥰
ReplyDeleteRecap the story that the poem tells..I wish it was longer👌☮️
ReplyDeleteNice
ReplyDeleteYour Poem made us feel Proud to being maharashtrian ! Blessed to be part of such cultural and beautiful hertitage.....✨
ReplyDeleteSuperb 👌
ReplyDeleteखुप छान शिवम..
ReplyDeleteGreat 👍
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDelete👍👌
ReplyDeleteLay bhari
ReplyDeleteKhup chan kavita
ReplyDeleteKhup chan kavita
ReplyDeleteNice
ReplyDeleteमस्त कविता आहे
ReplyDeleteKhup sundar
ReplyDelete👍👌
ReplyDeleteजय महाराष्ट्र 🚩
ReplyDeleteGreat 👍
ReplyDeleteJay Maharashtra
ReplyDeleteJai Maharashtra...Chan aahe kavita
ReplyDeleteउत्कृष्ट👍👏
ReplyDeleteThis poem made me feel proud to being maharashtrian💫🚩
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteअप्रतिम 👏
ReplyDelete"जय महाराष्ट्र"
ReplyDeleteशिवछत्रपतींचा महाराष्ट्र..!!🛐🚩