कारण, चंद्र आभाळाच्या प्रेमात पडला....

सुर्यमालेमध्ये तो प्रकाशासोबत भटकला,
अवकाशामध्ये काणाकोपऱ्यात हरवला,
शेवटी पृथ्वीभोवती येऊन तो थांबला,
कारण, चंद्र आभाळाच्या प्रेमात पडला.

सायंकाळी डोंगरदऱ्यांमागे सुर्य लपला,
पृथ्वीभोवती काळोख अंधार पसरला ,
सायंकाळी पाऊस देखील बरसला,
कारण , चंद्र आभाळाच्या प्रेमात पडला.

सुर्य शांत समुद्रात झोपी गेला,
जाता जाता त्याने आभाळाला बोलावला,
सप्तरंगी इंद्रधनु त्याने चंद्राला दाखवला,
कारण, चंद्र आभाळाच्या प्रेमात पडला.

पश्चिमेकडे शुक्राचा तारा तो चमकला,
संपुर्ण आकाशात काळोख पसरला,
समुद्राच्या भरती-अहोटीचा वेग वाढला,
कारण, चंद्र आभाळाच्या प्रेमात पडला.

चंद्रान् आकाश प्रकाशित केला,
आभाळाने मातृभुमी ओला केली,
दोघांच्या सौंदर्याने निसर्ग शोभून निघाला,
कारण, चंद्र आभाळाच्या प्रेमात पडला.

Comments