कारण , बाप हा बापच असतो.

एकेकाळी साबण लावून दाढी तो करतो,

निकाललागल्यावर गुपचुप पेढे तो आणतो,

मुलाच्या  आनंदात स्वतःचा आनंद तो पाहतो,

कारण , बाप हा बापच असतो.


मुलाच्या सर्व चुका पोटात तो घालतो,

मुलासाठी पूर्ण जागाच त्याग तो करतो,

वेळ आली  तर स्वतः उपाशी राहतो,

कारण , बाप हा बापच असतो.


जगासमोर तो नेहमी आनंदात राहतो,

परिवारासोबत तो सदैव हसतो,

पण एकाटा असताना मात्र खूप रडतो,

कारण , बाप हा बापच असतो.


सर्व सोडून तो आहे त्या कपड्यावर येतो,

शून्यातून संपूर्ण जग निर्माण करतो,

आपल्या लहानश्या परिवाराची काळजी तो घेतो,

कारण , बाप हा बापच असतो.


बाप तर बापच असतो,

हा कवी बापासाठीच लिहतो,

बापासाठी कवी जग जिंकतो,

बाप हा बापच असतो.

Comments