माझी मराठी जननी

पसरवतो पहिला पाऊस बरसताच सुगंध,

काळ्यामातीत बैलांसोबत जोडते आमचे संबंध,

जशी पसरते ताज्या दुधावरती साय,

शेतकऱ्यासोबतही राबते माझी मराठी माय. 


आनंद पसरवते सुर्योदयाच्या किरणांतुन,

दुःख मिटवते विठ्ठल-रुक्मीनीचे नावातुन,

उन्हातान्हात गाई-वासरांना देते सावली,

पंढरीच्या दिशेने चालते माझी मराठी माऊली. 


शिकतो व शिकवतो आम्ही तुकोबांच्या गाथा,

वक्रतुंड चरणी टेकवतो आम्ही आमचा माथा,

इंद्रायणीकाठी उमटले आमच्या ज्ञांनेश्वरांचे पाय,

संत-भक्तांसोबत भजन गाते माझी मराठी माय.


नाटककारांसोबत व्यायसपीठावर उतरते,

चित्रकाराच्या चित्रांमधुन स्मितहास्य देते,

लेखकाच्या लेखणीमधुन धावते शाई,

ग्रंथ-पुस्तकांमध्ये राहते माझी मराठी आई.


पक्ष्यांसोबत हरवते ज्वारीच्या कोंबावर,

ओव्या गाते बहिणाबाई सोबत जात्यावर,

भाकरी-चटणी सोबत आहे तिची जवळीकता,

अनोळख्याचीही पाहुणचार करते माझी  मराठी माता.


काळ्यामातीत गाळलेला घाम, आहे आमची शान,

पक्ष्यांच्या हातून रुजलेल्या बियानांना देते जीवनदान,

पाणी पाजते प्रवाशांना नदीच्या पात्री,

स्वर्गातही वास करते माझी मराठी जन्मदात्री.


अज्ञानाचा अंधकार मिटवते सरस्वती देवीची शाई,

माझ्यावरती संस्कार घडवते माझी मराठी आई,

हिरवळ पसरवते तिथे, जिथे ठेवते पाय,

इतिहासापासून समृध्द आहे माझी मराठी माय.



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. अप्रतिम...... निशब्द.....👍💯

    ReplyDelete
  2. छान काव्यरचना 👌

    ReplyDelete
  3. खूप सुंदर !!👏👍

    ReplyDelete
  4. अप्रतिम

    ReplyDelete
  5. अप्रतिम काव्यरचना❤🙏
    माय मराठी🙏🙏

    ReplyDelete
  6. अप्रतिम रचना
    सौ. संपदा

    ReplyDelete
  7. अद्भूत, अविस्मरणीय अशी काव्य रचना मित्रा...👌👌👌

    ReplyDelete
  8. Khup chhan 🤩

    ReplyDelete
  9. Mast 👍🏻✌🏻

    ReplyDelete
  10. अप्रतीम 👌

    ReplyDelete
  11. अप्रतिम

    ReplyDelete

Post a Comment