ही वाट जाते कुठे...??

युध्दभुमीवर रक्ताच्या नद्या वाहतात,
अनेक परिवार तिथेच हरवतात,
नर्क यातना भोगावी लागता तिथे,
अरे विठ्ठला, ही वाट जाते कुठे...?

रस्त्यावर लोक भुकेने मरतात,
उन-पावसात तिथेच राहतात,
मानुसकीही विचारत नाही तिथे,
अरे विठ्ठला , ही वाट जाते कुठे...?

अन्नदाता त्यांच्या शिवारात राबतात,
पुर्ण जगाचे पोट खाऊ घालुनी भरतात,
तरी देखील आत्महत्या करावी लागती तिथे,
अरे विठ्ठला , ही वाट जाते कुठे...?

अनेक वारकरी पंढरपूरडे चालतात,
मनापासून भक्त तुझी पुजा करतात,
दर्शन मिळत नाही तुझ्या भक्तांना तिथे,
अरे विठ्ठला, ही वाट जाते कुठे...?

तुझे रुप पाहुन होतो मी देखील दंग,
नेहमी असते मुखी तुझे नाम पांडुरंग,
तरी  देखील भोगतो आम्ही दुःख ईथे,
अरे विठ्ठला , ही वाट जाते तरी कुठे,
            जाते तरी कुठे...??

Comments

Post a Comment