कवितेच्या एका कडव्यात

ढगफुटीने अंबर जमीनीवर कोसळते,
वनव्याने कानन संपुर्ण राख होते,
वसुंधरा आपत्ती धारण करते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
        संपुर्ण दुःख समावते.

पंकज चिकलामध्ये खिलते,
शेतातील विहिरीवर रऱ्हाट फिरते,
सरीता डोंगरातून शांतपणे वाहते,
अन् कवितेच्या एका कडव्यात 
       संपुर्ण निर्सग वास करते.

ग्रंथामधुन जीवन गौरव होते,
ज्ञानाचा गंध त्यातुंन पसरते,
शब्दांमध्याच शब्द हरवते,
अन् कवितेच्या एका कडव्यात 
        संपुर्ण साहित्य समावते.

सायंकाळी सुर्य विश्राम करते,
त्याचवेळी रजनीनाख चमकते,
पृख्वीवरती स्वःताच छाप छापते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
      संपुर्ण विश्व वास करते.

कवितेमध्ये भावना लपते,
त्यातुनी ते प्रेम दर्शवते,
क्रोधाचा तिथेच अंत करते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
       एका कविते दर्शण घडते..!

Comments

Post a Comment