लेखणी अण् शाईची महती,
ते सर्व कागदावर उमटती,
त्यामध्ये भावना हरवती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?
वाक्यांचे मिळुनी पुस्तके बनती,
पुस्तकातुन ज्ञान सापडती,
त्यामधून ते जीवन शिकवती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?
आकाशातून वात वाहती,
त्यातुन पावसाचे खेंब बरसती,
मातीतून नवीन कोंब उगवती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?
सुर्याचे किरण पृथ्वीकडे धावती,
कोकीळा मधुर गीत गाती,
संपुर्ण पहाट शोभिवंत दिसती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?
ह्रदयातुन रक्त वाहती,
त्यामध्ये भावना तयार होती,
भावनेतून काळजी जन्म घेती,
अरे प्रेमा तुझे नावे किती..?
Comments
Post a Comment