नकार तुझा..

तुझ्यासोबतच दिवसभर चॅटींग करावे,
रात्रभर तुझ्यासोबत फोनवर बोलावे,
तुझ्या प्रोफाईल फोटो बघत बसावे,
अन् शेवटी नकार तुझा मज मिळावे.

तुझ्या मागोमाग गावभर भटकावे,
रात्री तुझ्या स्वप्नात मी यावे,
तु जेवल्यावरच मी जेवन करावे,
अन् शेवटी नकार तुझा मज मिळावे.

तुझ्यावरती अनेक चारोळ्या लिहावे,
तुझ्या सौदर्यावरती अनेक लेख लिहावे,
लेखणी देखील तुझ्याच आवडीची घ्यावे,
अन् शेवटी नकार तुझा मज मिळावे.

ग्रंखालयात जायचे मी सोडावे,
बागेमध्ये तुझ्यामागोमाग फिरावे,
तुझ्यासाठीच लिखाण मी थांबवावे,
अन् शेवटी नकार तुझा मज मिळावे.

शेवटी नकार तुझा मज मिळावे,
त्यानंतर पुन्हा मी साहीत्यात हरवावे,
दिवस-रात्र फक्त कविताच रचावे,
अन् ‘युवाकवी’ म्हणून जग आोळखावे.

Comments

Post a Comment