आयुष्य.

चार भिंती मध्ये हरवते आयुष्य,
रस्त्यावरती चालते ते आयुष्य,
मोकळ्या मैदानात खेळते आयुष्य,
मंद वाऱ्यासोबत वाहते ते आयुष्य.

पावसासारखे बरसते ते आयुष्य,
इंद्रधनुसारखे रंगते ते आयुष्य,
चांदण्यासारखेच चमकते आयुष्य,
अन् चंद्रसारखे प्रेम करते आयुष्य.

शब्दांमध्ये अडकते ते आयुष्य,
शाई सोबत उमटते ते आयुष्य,
पुस्तकांमध्ये खेळते ते आयुष्य,
साहित्यासोबत चालते आयुष्य.

नदीच्या पाण्यात खळखळते आयुष्य,
समुद्रात मिसळते ते आयुष्य,
डोंगरदऱ्यात हिंडते ते आयुष्य,
पक्ष्यांसोबत गाते ते आयुष्य.

दुःखासोबत हसवते ते आयुष्य,
आनंदासोबत रडवते ते आयुष्य,
मृत्यूनंतर जन्म देते ते आयुष्य,
शेवटी नर्कामध्येच स्वर्ग आहे ते आयुष्य. 

Comments