अन् चिंब चिंब भिजवून चातो..!

इवलेशे कोवळे तण वाट पाहतो,
वाळलेले झाड आवकाशात बघतो,
तेव्हा नभ आकाशात दाटूनी येतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

चंद्राच्या प्रकाशाने आभाळ चमकतो,
विजेचा कडकडात सगळीकडे होतो,
काळोख आभाळ हजेरी लावतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

शेतकरी आतुरतेने वाट पाहतो,
बैल खांद्यावर नांगर घेतो,
मेघराजा त्यावर प्रसन्न हातो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

मोर जंगलात पंख पसरवतो,
कवी लेखणी कागदावर ठेवतो,
गगनात तेव्हा संतोष पसरतो,
अन् चिंब चिंब भिजवून चातो..!

धरतीमधुन मातीचा सुगंध सुटतो,
इंद्रधनु सप्तरंगाने अचंबित करतो,
तेव्हा अंबर सर्वांना प्रणाम म्हणतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातोा..!

Comments