लेखणीतील शाईने सर्व काही लिहावे,
वाक्यांचा विळख्यात शब्द ते हरवावे,
शेवटी सर्व जाऊनी पुस्तकांनध्ये बसावे,
शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.
लेखणीतील शाईने हसणाऱ्याला हसवावे,
दु:खामध्ये रडणऱ्याचे दु:ख मिळवावे,
प्रत्येकाच्या मनातील राग ते जिंकावे,
शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.
लेखणीतील शाईने क्रोध विसरावे,
प्रत्येकक्षणी आनंदी आनंद व्यक्त करावे,
संकटांना संकटाच्या गर्भामध्येच टाळावे,
शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.
लेखणीतील शाईने कागदावरती उमटावे,
अप्रतीम काव्य, लेख त्या शाईने रचावे,
सुंदर अशा हस्ताक्षरांमध्ये दाहीदिशेने पसरावे,
शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.
लेखणीतील शाईने कागदावर प्रेम करावे,
सदैव कवी, लेखकांच्या सानिध्यात असावे,
ह्या कवींच्या मनातून सगळीकडे व्यक्त व्हावे,
अन् शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.
Comments
Post a Comment