कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.

नाही कधीही तो पहाटे उजाडतो,

ना ही सायंकाळी घरी तो परततो,

ना ही त्याने मानली आजपर्यंत हार

कारणसुर्य आहे एक महान कलाकार.


घडते त्याच्यामुळे पुर्ण ही सृष्टी,

त्याच्यामुळेच मिळाली प्रत्याकाला दृष्टी,

अजुनही वाट पाहतात दिशा चार,

कारणसुर्य आहे एक महान कलाकार.


कायम दिसतो तो आकाशात तो नारंगी,

त्याच्याशिवाय प्रत्येकाचे जीवन आहे बेरंगी,

करतो तो प्रत्येक चित्रकाराच्या मनात वार,

कारणसुर्य आहे एक महान कलाकार.


भरदुपारी आगी सारखा तापतो तो रवी,

त्याच्यावरतीच भास्य करतोय हा कवी,

करतो तो प्रत्येक ठिकाणी चमत्कार,

कारणसुर्य आहे एक महान कलाकार.


नाही लागत त्यास राज्यासाठी दरबार,

स्वतकाम करून पिकवतो तो शिवार,

शेतकरी देखील आहे त्याचा एक परिवार,

कारणसुर्य आहे एक महान कलाकार.

Comments