माझे शब्द कविता लिहीतात,
कवितेतून भावना ते प्रकट करतात,
एखाद्याला त्याची जागा ते दाखवतात,
कारण, माझे शब्द निश्चीतपणे बोलतात.
बोलताना प्रत्येकाचे मन ते जिंकतात,
एखाद्याला शब्दांमध्ये हरवून फिरवतात,
जिथे बघाल तिथे माझेच शब्द सापडतात,
कारण, माझे शब्द प्रत्येकाला बोलतात.
माझे शब्द कादंबऱ्या रचतात,
भाषेमधुन माझे शब्द टोचतात,
शहाण्याला ते खुपच सन्मान देतात,
कारण माझे शब्द उद्देशून बोलतात.
माझे शब्द बोलतात,
माझे शब्द प्रेम करतात,
माझे शब्द राग व्यक्त करतात,
कारण माझे शब्द जगतात.
माझे शब्द जगतात,
ते मलापण जगवतात,
ते माझी शान वाढवतात,
कारण माझे शब्द बोलतात.
Comments
Post a Comment