एकांत

पहाटे लवकर उठून नमन करावे,
प्रसन्न  वातावरनणात कसरत करावे,
पुर्वेकडे सुर्वण सुर्योदय तो पहावे,
अन् पाहटचा आनंद एकांतात घ्यावे.

पक्ष्यांचा किलबिलाट तो एकावे,
गोमातेचे दुध देखील काढावे,
मोराचा नाच वर्षावनात पहावे,
अन् प्राणीमात्रांचा आनंद एकांतात घ्यावे.

अनेक ग्रंथालये पालथे घालावे,
हजारो पुस्तके वाचुनच काढावे,
सरस्वती मातेल देखील नमन करावे,
अन् ज्ञान देखील एकांतात ग्रहण करावे.

कठोर रस्त्यावरती देखील चालावे,
ज्ञानांची ज्योत स्वःताच पेटवावे,
कंबर कसून कसोटीची तयारी करावे,
अन् विजय देखील एकांतात ग्रहण करावे.

जे सुचत जाते ते लिहूनच काढावे,
शेवटपर्यंत फक्त ध्येयाकडेच पहावे,
मतलबी जगासोबत एकांतात रहावे,
पण साहित्यासोबत मात्र एकनिष्ठ रहावे.

Comments