आयुष्यात ते एकदाच येतात,
येतात पण जीवन बदलतात,
मनात तर ते कायमचेच राहतात,
मैत्रीणी पेक्षा ह्रदयात जास्त राज्या ते करतात.
खऱ्या मैत्रीची अर्थ समजावतात,
दुसऱ्याचे दुःख हिरावून घेतात,
आजारपणात नेहमी साथ देतात,
जेव्हा येतात आनंदाचाच आनंद वाढवतात.
ते आल्यावर आपोआप कमी होतो तो ताण,
देऊ वाटत नाही कधीही त्यांना सन्मान,
पण मनामध्ये खुप असतो तो मान,
एखाद्या व्याक्तीची असतात ते शान.
तेच आहेत मदतीला हात,
नेहमी असणार त्यांचा साथ,
वेगळाच असतो त्यांचा थाट,
कारण, जन्मो-जन्मांची आहे त्याच्यासोबत गाठ.
प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत ते अविभाज्य पात्र,
शेवटी असणार ते आपले सोबत मित्र.
-©️Shivam Satywan Madrewar
Comments
Post a Comment