अवकाशाकडे पाहतच बसावे,
निर्सगाच्या सानिध्यात हरवावे,
काळ्या कापसाच्या ढगांचे वाटपहावे,
अन् पाऊस आल्यावर त्यात भिजावे.
रस्त्यावर तासन-तास चालावे,
रानावनात बांधो-बांधी भटकावे,
गावो-गावी भरकटत जावे,
अन् पाऊस आल्यावर त्यात भिजावे.
शेतशिवारामध्ये नांगरणी करावे,
ट्रॅक्टर मधून बियानांची पेरणी करावे,
गोठ्यामध्ये बैलांसोबत वाट पहावे,
अन् पाऊस आल्यावर त्यात भिजावे.
पावसानंतर मातीचा सुगंध घ्यावे,
त्यामध्ये ध्येयभान हरवून ते जावे,
पुन्हा पुन्हा तो सुगंध घेऊ वाटावे,
अन् पाऊस आल्यावर त्यात भिजावे.
सुर्यप्रकाशात दवबिंदू चमकावे,
डबक्यात पाऊसाचे पाणी साचावे,
चिखलामध्ये लहानमुलासारखे खेळावे,
अन् पाऊस आल्यावर त्यात भिजावे.
Comments
Post a Comment