डोळ्यातील आभाळ


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

ह्या धरती मातेला हिरवळीमध्ये बदलावे,

संपुर्ण आकाश आपल्याच ताब्यात घ्यावे,

अन् त्या चंद्राला देखील स्वत:च्या प्रेमात पाडावे.


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

सोसाट्याच्या वाऱ्याने संपुर्ण क्रोध वाहुनी न्यावे,

पक्ष्यांसारखे स्वतंत्र्यपणे आकाशात भटकावे,

अन् या धरती मातेला वर्षाने समृध्द करावे.


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

आपल्या जादुने इंद्रधनू आभाळात दाखवावे,

सप्तरंगी इंद्रधनू प्रमानेच आयुष्य रंगवावे,

अन् विजांच्या कडकडाटेने आनंदाचे गीत गावे.


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

पसरता पसरता अंधाराला बोलवावे,

मावळत्या सुर्याने सर्व दु: संपवावे,

अन् उगवत्या सुर्याने संपुर्ण जग.


डोळ्यातील आभाळ सगळीकडे पसरावे,

जसे निर्सगाच्या हिरवळीमघ्ये भटकावे,

ह्या आभाळासोबत अवकाशात हरवावे,

अन् डोळ्यातील आभाळाने आनंद बरसावे.

Comments