रोजचीच ती सांजवेळ

सायंकाळी पश्चिमेकडे तांबडा रंग पसरते,
सुर्याच्या रथाचा रंग नारंगी होते,
घरच्यादिशेने सुर्य प्रस्थान करते,
शेवटी रोजचीच ती सांजवेळ मावळते.

दिवसभर घार आकाशात घिरक्या घेते,
कोकीळा झाडावरती कुहू-कुहू गाते,
चिमणी  घरट्याच्या दिशेने वाटचाल करते,
शेवटी रोजचीच ती सांजवेळ मावळते.

शेतकरीण शिवारात पाणी पाजते,
गाई मैदानावर जाऊन गवत खाते,
वासरे त्यानंतर गोठ्याकडे परतते,
शेवटी रोजचीच ती सांजवेळ मावळते.

वाहत्या वाऱ्याचा वेग मंदावते,
आकाशात काळोख पसरते,
चंद्राकोराची शुभ्रता ती वाढते, 
शेवटी राजचीच ती सांजवेळ मावळते.

लेखणी व शाईने मिलन होते,
त्यांचे सौंदर्य कागदावरती उमलते,
त्यातुंन ते क्रोध-दुःखाचा अंत करते,
शेवटी रोजचीच ती सांजवेळ मावळते.

Comments