पुन्हा नवाने रस्ते गजबजतील,
पुन्हा नवाने गाड्या फिरतील,
पुन्हा नव्याने हाॅर्न वाजतील,
अन् पुन्हा नवाने आनंद साजरा होईल.
पुन्हा नव्याने पशु-पक्षी गातील,
पुन्हा नव्याने क्रोध विसरतील,
पुन्हा नव्याने राॅकेट झेप घेतील,
अन् पुन्हा नव्याने विजय साजरा होईल.
पुन्हा नव्याने लोक कामावर जातील,
पुन्हा नव्याने पाऊले पण चालतील,
पुन्हा नव्याने अश्व वेगाने पळतील,
अन् पुन्हा नव्याने संकटे मिटतील.
पुन्हा नव्याने सुर्य तो उगवेल,
पुन्हा नव्याने पाणी देखील वाहेल,
पुन्हा नव्याने हिरवळ पसरेल,
अन् पुन्हा नव्याने दुःख हरवेल.
पुन्हा नव्याने न्याय जिंकेल,
पुन्हा नव्याने सत्य चमकेल,
पुन्हा नव्याने अन्याय बिछडेल,
पुन्हा नव्याने मानव इतिहास रचेल.
Comments
Post a Comment