अन् साहित्याशी मात्र एकनिष्ठ असावे...

दिवसरात्र पुस्तकामध्येच रहावे,
सदैव त्या कादंबऱ्याच वाचावे,
शब्दांमध्येच सर्वजण हरवावे,
अन् साहित्याशी एकनिष्ठ रहावे.

झोपताना एखादी लघुकथा लिहावे,
त्याचवेळी एखादी अंगाई गावे,
शांत मनाने झोपून देखील जावे,
अन् साहित्याशी एकनिष्ठ रहावे.

लाकडी लेखणी मध्ये शाई भरावे,
एखादा पांढराशुभ्र कागद घ्यावे,
त्यावरती फक्त लिहतच जावे,
अन् साहित्याशी एकनिष्ठ रहावे.

अनेक महाकाव्य, खंडकाव्य पहावे,
हजारो कादंबऱ्या, ग्रंथपण घ्यावे,
कवितेवर कविता देखील रचावे,
अन् साहित्याशी एकनिष्ठ रहावे.

पु.ल.देशपांडें यांचे नाटक पहावे,
तुकारामांच्या ओव्या, श्लोक वाचावे,
आचार्य अत्रे यांचे लेख आचरणात आणावे,
अन् साहित्याशी मात्र एकनिष्ठच असावे.

Comments