अबोल ओठांनाही कधी...

रस्त्यवरील मुलाला हातात पुस्तक धरुद्या,
शाळेत जाणाऱ्याला शाळेत जाउद्या,
ध्येयवेड्याला ध्येयाच्या वाटेवर चालुद्या,
अन् अबोल ओठांनाही कधी शिक्षणाचे बोल बोलुद्या.

भारतीय जवानांना त्या सीमेवरती उभारु द्या,
समोरच्या जळक्या चीनींना धुळ चारुद्या,
पाकिस्तानी आतंकवाद्यांना कंठस्नान घालुद्या,
अन् अबोल ओठांनाही कधी राष्ट्रगीत गाऊ द्या.

खेळणाऱ्याला मैदानावरती खेळु द्या,
तेथे त्यांना धाम नक्कीच गाळु द्या,
कठीण सराव तेथे त्यांना करु द्या,
अन् अबोल ओठांनाही कधी विजयाचे गीत गाऊ द्या.

लेखकांना लेखणी हातात धरु द्या,
त्यांना चालू घडामोडींवर भास्य करु द्या,
त्यांच्या शाईतुन क्रोध बाहेर पडु द्या,
अन् अबोल ओठांनाही कधी अन्याय संपवू द्या.

प्रत्येकालाच मानवतेचे धदे शिकवू द्या,
जुलमी अन्यायाची कंबर तेथेच मोडू द्या,
भ्रष्ट्राचाराचे कार्य मुळापासून संपवू द्या,
अन् अबोल ओठांनाही कधी सत्याचे बोल बोलुद्या.

Comments