शाळेचा पहिला दिवस

नवीन गणवेश धारण करायचे,
चिखलामध्ये पाय ठेवत चालायचे,
पाठीवर नवीन दप्तर घ्यायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.

कोणालाही न बोलता शाळेत यायचे,
हात जोडून, डोळे बंद करून प्रार्खना म्हणायचे,
मधल्या बाकावर गुपचुपपणे बसायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.

नवनवीन पाठ्यपुस्तक घ्यायचे,
त्याच्याच सुगंधात दरवळायचे,
त्यातील चित्रे पाहत बसायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.

दुपारच्या सुट्टीत सरकारी भात खायचे,
त्या हापस्याचे घोटभर पाणी प्यायचे,
एखाद्या मित्रासोबत वर्गात यायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.

शेवटी वर्गात बसुन घराची आठवण काढायचे,
एकमेकांकडे बघुन खुप-खुप रडायचे,
घंटा वाजल्यावर घरी पळत सुटायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.

Comments