हरवलेली मैत्रीण

खुप वर्षांपूर्वी ती हरवली होती,
सायंकाळी माझ्यासोबत खेळत होती,
अभ्यासात मला मदत करत होती,
अन् हरवलेली मैत्रीण मला पुन्हा सापडली होती.

सन-समारंभात शुभेच्छा देत होती,
मनसोक्त ती मजला बोलात होती,
आजारपणात देखील सोबत होती,
अन्  हरवलेली मैत्रीण मला पुन्हा सापडली होती.

अभ्यासात फारच हुषार ती होती,
मोत्यासारखे अक्षरे ती लिहीत होती,
वाचताना श्रेत्याचे मन जिंकत होती,
अन् हरवलेली मैत्रीण मला पुन्हा सापडली होती.

शाळेत मला घेऊन जात होती,
नवनविन मला ती शिकवत होती,
जेवतानापण मला घेऊन जेवत होती,
अन् हरवलेली मैत्रीण मला पुन्हा सापडली होती.

मैत्रीण नव्हे माझी बहिण ती होती,
लहान भावासारखे मला जपत होती,
माझ्यासाठी ती ताईतील आई होती,
अन् हरवलेली माझी ताई मला पुन्हा सापडली होती.

Comments