शत्रु मित्र

एखाद्या मित्रासोबत खुपजवळ यावे,
त्याच्या सोबतच नेहमी जेवन करावे,
गल्ली-नगरातुन त्याच्यासोबत फिरावे,
अन् जवळच्याच मित्राने विश्वासघात करावे.

एखाद्या मित्राला भावासारखे मानावे,
त्याच्यासोबत फोटो पण काढावे,
त्याला परिक्षेतही मदत करावे,
अन् जवळच्याच मित्राने विश्वासघात करावे.

एखाद्या मित्रावर विश्वास ठेवावे,
त्याला आपले गुपीत पण सांगावे,
त्याने शत्रुसोबत हातमिळवणी करावे,
अन् जवळच्याच मित्राने विश्वासघात करावे.

एखाद्या मित्राला खुप आदर द्यावे,
त्याला मेल चा पण पासवर्ड द्यावे,
त्याने मित्राच्याच पाठीत वार करावे,
अन् जवळच्याच मित्राने विश्वासघात करावे.

शत्रु मित्रापासुन चार हात लांब रहावे,
त्याच्या नावात मैत्रीचा कलंक लावावे,
मित्र नाही दानव त्याला म्हणावे,
अन् जवळच्याच मित्राने विश्वासघात करावे

Comments