जेव्हा स्वर्ग पृथ्वीतलावर अवतरते,
अंतरीक्षाचा रंग पुर्णता: बदलते,
आभाळ रंग देखील जांभळा दिसते,
तेव्हा चंद्र आभाळाच्या प्रेमात पडते.
जेव्हा स्वर्ग पृथ्वीतलावर अवतरते,
कोकीळा गाणे गाऊन वंदन करते,
मोर पाऊसात नाचुन प्रणाम करते,
तेव्हा वसुंधरा हिरवळीचे नथ घालुन हासते.
जेव्हा स्वर्ग पृथ्वीतलावर अवतरते,
जमीनीवरील अवर्षण संपुन जाते,
ज्वालामुखीचे हुताशन लोप पावते,
तेव्हा अविरत समस्या मिटून जाते.
जेव्हा स्वर्ग पृथ्वीतलावर अवतरते,
कवींना त्या सर्वांची चाहुल लागते,
चित्रकारांचे कागदावर चित्र उमटते,
तेव्हा कलाकारांची कला साजर होते.
जेव्हा स्वर्ग पृथ्वीतलावर अवतरते,
पंकज चिखलात आनंदात खिळते,
सुर्याचा स्वर्ण रथ प्रस्थान करते,
तेव्हा परमेश्वराचे साक्षात दर्शण होते.
खूप छान!!👌👌
ReplyDelete