शेवटी माझी स्वप्न परी मज मिळावे.

माझ्या पावलावर तु पाउल टाकावे,
मला जे आवडते ते देखील तुच करावे,
माझ्या सर्व आवडी तु स्वत: निवडावे,
शेवटी माझी स्वप्न परी मज मिळावे.

प्रेम व्यक्त करण्यासाठी गप्प रहावे,
प्रेम व्यक्त करताना शब्दांशी तु बोलावे,
प्रियकरास तु प्रेमपत्र देखील लिहावे,
शेवटी माझी स्वप्न परी मज मिळावे.

प्रियकराच्या सर्वच कविता तु वाचावे,
त्याचे साहित्यातले अनेक चुका काढावे,
मनातल्या मनांत त्याचे कौतुक करावे,
शेवटी माझी स्वप्न परी मज मिळावे.

दिवसरात्र स्वःताच कादंबऱ्या वाचावे,
प्रियकरास कवितेस स्वःता विषय सुचवावे,
कविता लिहीन्यासाठी त्याचे मन बदलावे,
शेवटी माझी स्वप्न परी मज मिळावे.

या कविंच्या मनावर तुझेच राज्य असावे,
कवीसोबत तु देखील कविता लिहावे,
कवी-कवयित्री ची जोडी आपली असावे,
शेवटी माझी स्वप्न परी मज काव्यातुन मिळावे.

Comments