दरवेळी मी माझी लेखणी हातात धरतो,
त्या पुस्तकांच्या पानात मी हरवतो,
आज माहीत नाही शब्दांना काय झाले.?
अन् चक्क शब्द ‘सुट्टीवर जातो’ म्हणाले..!!
दरवेळी मी माझ्या लेखणीत शाई भरतो,
अनेक शब्दकोश देखील मी चाळतो,
आज माहीत नाही शब्दांना काय झाले.?
अन् चक्क शब्द ‘सुट्टीवर जातो’ म्हणाले..!!
दरवेळी सुर्य महाराज पुर्वेलाच उगवतो,
पृथ्वी मागोमाग चंद्र देखील धावतो,
आज माहीत नाही शब्दांचा काय झाले.?
अन् चक्क शब्द ‘सुट्टीवर जातो’ म्हणाले..!!
प्रत्येक व्यक्ती त्याची मातृभाषा बोलतो,
त्यातुन तो त्याची भावना प्रकट करतो,
आज माहीत नाही शब्दांचा काय झाले.?
अन् चक्क शब्द ‘सुट्टीवर जातो’ म्हणाले..!!
दरवेळी मी माझ्या शब्दांसोबतच बोलतो,
प्रत्येकक्षणी मी त्यांच्या सोबतच राहतो,
आज माहीत नाही शब्दांचा काय झाले.?
अन् चक्क शब्द ‘सुट्टीवर जातो’ म्हणाले..!!
Comments
Post a Comment