अंधार आता पसरला,
झाडामागे मागे गेला,
ढगामागे तो लपला,
झोपला,
चंदामामा आता झोपला.
ताई सोबत तो खेळला,
बाबा सोबत तो जेवला,
आईच्या खुशीत पळाला,
झोपला,
चंदामामा आता झोपला.
आईने आईस्क्रीम आणला,
सगळा त्याने ते खाल्ला,
केसर दुध त्याने पिला,
झोपला,
चंदामामा आता झोपला.
दिवसभर मित्रांसोबत खेळला,
खुप अभ्यास त्याने केला,
आता मात्र तो खकला,
झोपला,
चंदामामा आता झोपला.
आजींची गोष्ट ऐकला,
ताऱ्यांना तो बघितला,
स्वप्नात तो हरवला,
झोपला,
चंदामामा आता झोपला.
Comments
Post a Comment