शेवटी माझ्या लेखणीने संप धारण केले.

ग्रंथालयामध्ये पुस्तकांचे संच हरवले,
कागदे देखील रद्दीत विकले गेले,
त्यांची जागा आता मोबाईलने घेतले,
शेवटी माझ्या लेखणीने संप धारण केले.

त्यांच्यासोबतच मी माझे बालपण घालवले,
त्यांनीच मला शिक्षण शिकवले,
त्यांची जागा आता गुगलने घेतले,
शेवटी माझ्या लेखणीने संप धारण केले.

प्रत्येकव्यक्तीने मोबाईलवर इंटरनेट चाळले,
त्यामुळे पुस्तकांचे महान राज्या हरवले,
नवीन बाजारपेठ आत्ता उपलब्ध झाले,
शेवटी माझ्या लेखणीने संप धारण केले.

इंटरनेटमुळे प्रत्येकाने ईमेल तयार केले,
त्यामुळे पत्रव्यवहार संपुर्ण ठप्प झाले,
वाट पाहण्याऱ्या उत्सुकतेने आत्महत्या केले,
शेवटी माझ्या लेखणीने संप धारण केले.

लेखणी मुळे माझे हस्ताक्षर सुधारले,
नोटपॅडमुळे त्यांचे महत्त्व नाहीसे झाले,
लेखणी वर राज्य करणारे राजे हरवले,
शेवटी माझ्या लेखणीने संप धारण केले.

Comments