भौतिकशास्त्राचे एक शिक्षक

न्यूटनने गुरुत्वाकर्षणचे शोध लावले,
केप्लरने अंतराळातील ग्रह पळवले,
फॅराडेने विजेला तारेतुन पाठवले,
आणि या सर्वांचे नियम तुम्ही आम्हाला शिकवले.

अनेक धातुंमध्ये सर्व इलेक्ट्राॅन हरवले,
त्यापासुन अणुबाँब देखील तयार केले,
त्याचा आईंस्टायन मामु ने फाॅम्युला लिहीले,
आणि तो फाॅम्युला तुम्ही आम्हाला शिकवले.

आम्हाला पाण्यात वस्तुचे प्रतीबिंब दिसले,
सायंकाळी सुऱ्याच्या प्रकाशाचे निर्वतन झाले,
प्रकाशकाचे किरण धावून आले, 
आणि हे सर्व तुम्ही फळ्यावरती मांडले.

पाण्याच्या पृष्ठभागावर ताण तयार होते,
घणवस्तुंमध्ये घर्षण निर्माण होते,
न्युटनच्या पहिल्या नियमात प्रत्येक वस्तु स्थिर राहते,
आणि तुमच्या तासाला प्रत्येकजण हरवते.

कित्येक जण होतात ह्या विषयात नापास,
हवाहवासा आहे सर तुमचा भौतिकशास्त्राचा तास.
जेव्हा शिकवाल सर तुम्ही आम्हाला हळु,
तेव्हा आम्ही प्रकाशाच्या वेगाने पळु.

Comments