महामारी त्याने जगात पसरवले,
प्रत्येकालाच घरी त्यानेच खांबवले,
कोरोना आला आहे पृथ्वीवर पहिल्यांदा,
यांवर काय बोलशील तु ज्ञानदा...?
अनेक लोक बाजारातुन फिरले,
त्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हरवले,
देशात अनलाॅक आहे हा दुसऱ्यांदा,
यांवर काय बोलशील तु ज्ञानदा..?
असंख्य युवक दुचाकीवरती फिरले,
चौकात पोलीसांनी त्यांना पकडले,
होम क्वारंटाईन झाले बिचारे तिसऱ्यांदा,
यांवर काय बोलशील तु ज्ञानदा..?
कोरोनावरचे अनेक लेख मी वाचले,
त्यानंतर मी लेखणी हातात पकडले,
कोरोनावर कविता लिहीत आहे मी चौथ्यांदा,
यांवर काय बोलशील तु ज्ञानदा..?
टीव्हीवरती तुला संपुर्ण महाराष्ट्र पाहते,
तुझ्याबोलण्याकडे प्रत्येकाचे लक्ष असते,
नाव घेत आहे मी तुझे पाचव्यांदा,
यांवर काय बोलशील तु ज्ञानदा..?
Comments
Post a Comment