शेवटचा श्वास

महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घ्यावे,
सह्याद्रीच्या त्या खुशीत मी खेळावे,
मराठी आईच्या संगतीमध्ये मी वाढावे,
अन् शेवटचा श्वास महाराष्ट्रातच घ्यावे

पु.ल. चे विनोदी साहित्य वाचावे,
आचार्य अत्रे यांचे जिवंत कविता पहावे,
माडगुळकरांसोबत गाण्याला चाल बसवावे,
अन् शेवटचा श्वास महाराष्ट्रातच घ्यावे.

छत्रपती शिवरायांना मुजरा करावे,
लोकमान्य टिळकांना आदर्श मानावे,
दख्खनच्या काळ्या मातीत बालपण हरवावे,
अन् शेवटचा श्वास महाराष्ट्रातच घ्यावे.

पुण्यातील पुणेरी पाट्या वाचावे,
कोल्हापूरची झणझणीत मिसळ खावे,
रत्नागीरीच्या हापुसाचे रसाची चव चाखावे,
अन् शेवटचा श्वास महाराष्ट्रतच घ्यावे.

काळ्या मातीमध्ये दिवसरात्र राबावे,
मराठी साहित्यात ममतेचे बीज पेरावे,
महाराष्ट्र, मराठी अन् सह्याद्री हे तीन शब्द पाळावे,
अन् शेवटचा श्वास महाराष्ट्रातच घ्यावे.

Comments