कवि शिवम मद्रेवार व भौतीकशास्त्राचे प्रोफेसर

पृथ्वीमध्ये ‘गुरुत्वाकर्षण बल’ आहे असे न्युटनने लावले अनुमान,
आर्किमिडीजने सांगितले “प्रत्येक गोष्टींला आहे वस्तूमान”
मद्रेवार म्हणाला, “हवेला कुठे वस्तूमान आहे सर ?”
“केला का फोर्स अप्लाय” असे म्हणाले आमचे प्रोफेसर..!

ग्रहांची अधीक माहिती देतात केप्लरचे नियम,
महत्वाचा आहे तो इंद्रधनुंच्या रंगांचा क्रम,
मद्रेवार म्हणाला “प्रकाशचे किरण परार्वतीत झाले सर”,
“घातली का वीज तारेतुन” म्हणाले आमचे प्रोफेसर.!

काळा रंग नेहमी जास्त शोषतो ती उष्णता,
पाऱ्याला सगळ्यांपेक्षा जास्त आहे ती घणता,
मद्रेवार म्हणाला “सुर्य उत्तरेकडे पळत आहे सर..!”
“मोडला का न्यूटनचा दुसरा नियम” म्हणाले आमचे प्रोफेसर..!

आयंस्टायन ने दिले आम्हाला अनेक इक्वेशन,
ॲपियरचा नियम वापरुन काढलो आम्ही सोल्युशन,
मद्रेवार म्हणाला “वेगेला दिशा दिली नाही सर..?”
“नाही बघितले का ‘वॅन-डी-ग्राफ जनरेटर’” असे म्हणाले आमचे प्रोफेसर.

नियम मोडुन वेक्टरचे केले आम्ही डिव्हीजन,
फोर्स चे तयार केले आम्ही फळ्यावरती ऐस्प्रेशन,
मद्रेवार म्हणाला, “तरंगाची वारंवारता खुपच कमी झाली सर”
“लाॅजीक गेटचा अभ्यास केला नाही का..?” असे म्हणाले आमचे प्रोफेसर.

फ्लेमींगचा नियम वापरुन विज गेली तारेतुन,
डोप्लरच्या ईफेक्टने आवाज पळाला तो हवेतून,
मद्रेवार म्हणाला, “तयार करु आपण गतीचा चौथा नियम सर”,
“आधी अभ्यास करा संपुर्ण भौतीकशास्त्राचा” असे म्हणाले आमचे प्रोफेसर.

Comments

  1. उत्कृष्ट माडणी ; खूप छान!!👌👌

    ReplyDelete
  2. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    ReplyDelete
  3. खूपचं सुंदर....🎊😀 किती छान शब्दांची मांडणी ..kadakkk 🎉😄

    ReplyDelete
  4. खूप सुंदर शब्द रचना....♥️💯

    ReplyDelete

Post a Comment