अनेकदा मी ठरवतो.

रात्री चंद्राकडे खुप प्रेमाने मी पाहतो,
त्या ताऱ्यांच्या पुंजक्यात मी हरवतो,
काळोख नभाकडे आश्चर्याने बघतो,
अन् त्यांच्यावर कविता लिहावे असे अनेकदा मी ठरवतो.

मोरासारखे पाऊसात जंगलामध्ये नाचतो,
सकाळी दवबिंदुमध्ये मोत्यासारखा चमकतो,
आभाळातुन मी डोकाऊन पाहत बसतो,
अन् त्यांच्यावर कविता लिहावे असे अनेकदा मी ठरवतो.

आईसोबत स्वयंपाक घरात भाज्या मी चीरतो,
वडिलांसोबत कामावर देखील मी जातो,
बहीणीसोबत सायंकाळी अंताक्षरी मी खेळतो,
अन् त्यांच्यावर कविता लिहावे असे अनेकदा मी ठरवतो.

निर्सगाच्या सानिध्यात मी एकटाच भटकतो,
त्या पुस्तकांच्या विळख्यात स्वःता हरवतो,
काव्यशब्दांच्या जाळ्यात मी नेहमी सापडतो,
अन् त्यांच्यावर कविता लिहावे असे अनेकदा मी ठरवतो.

कविता लिहावे असे अनेकदा मी ठरवतो,
पण शब्दांसोबत मी ही सुट्टीवरती जातो,
लेखणी-शाई सोबत संप धारण करतो,
त्यामुळे माझा संपुर्ण वेळ त्यामध्येच खपतो.

Comments