अन् कविंच्या जगात मी स्वत: हरवतो.

लेखणी-शाई सोबत मी तास तास बोलतो,
पुस्तकांसोबतच मी प्रत्येकठीकाणी हरवतो,
दरवेळी कागदांसोबत मी खेळत बसतो,
अन् कविंच्या जगतात मी स्वत: हरवतो.

रस्त्यावरती मी वेडेवाकडे चालत जातो,
त्या रस्त्याला अनेक मजेशीर उपमा देतो,
जाता-जाता आगळेवेगळे झाडाची रुपे पाहतो,
अन् कविंच्या जगात मी स्वत: हरवतो.

त्या चंद्राकडे रात्रभर पाहत बसतो,
ताऱ्यांच्या लुकलुकीत स्वत:ला पाहतो,
प्रकाशाच्या वेगाने मी नेहमी धावतो,
अन् कविंच्या जगात मी स्वत: हरवतो.

प्रत्येक कार्याचा मी विचार करतच राहतो,
कधी-कधी त्या विचारांमध्ये मला खेचतो,
त्या रुपात मी विश्वाचा अनुभव घेतो,
अन् कविंच्या जगात मी स्वत: हरवतो.

कविंच्या जीवनात मी दररोजच हरवतो,
प्रत्येक सेकंद मी त्या रुपात आढळतो,
भुतकाळात मी आश्चर्याने डोकाऊन पाहतो,
आणि मी स्वत:चा भविष्यकाळ लिहीतो.

Comments