शेतकऱ्यासारखा सदरा मी घालायचे,
श्रोत्यांच्या डोळ्यात आनंदाअश्रु आणायचे,
स्वतःमात्र व्यासपीठामागे खुप रडायचे,
अन् नाटककारासारखे कित्येक मुखवटे मी बदलायचे.
राजकारण्यांसारखे पांढरे कपडे घालायचे,
त्यांच्यासारखेच भाषणे ठोकत ठांबायचे,
पण स्वत:चे मात्र आचरण शुध्द ठेवायचे,
अन् नाटककारासारखे कित्येक मुखवटे मी बदलायचे.
म्हातारपणाचे दुःख मी मांडायचे,
अन्यायाचे छळ मी दाखवायचे,
स्वत: मात्र अन्यायामध्येच जगायचे,
अन् नाटककारासारखे कित्येक मुखवटे मी बदलायचे.
दुतर्फी नाटक मी स्वत: लिहायचे,
कवितेपेक्षा जास्त भावना मी सांगायचे,
कधी कधी सर्व काही मी सोडायचे,
अन् नाटककारासारखे कित्येक मुखवटे मी बदलायचे.
नाटककारासारखे कित्येक मुखवटे मी बदलले,
त्या मुखवट्यांमध्येच माझे असाह्य जीवन हरपले,
भावनांचे छत्र शेवटी दुःखाने कोसळले,
अन् शेवटी आनंदाने माझा साथच सोडले.
Comments
Post a Comment