त्या मैदानावरती अनेक खेळ रंगणार,
वर्गामध्ये अनेक विद्यार्थी घडणार,
पण काय माहिती नजर लागली कोणची....?
अन् नाही वाजली घंटा माझ्या शाळेची..!
शाळेत चविष्ट वरण-भात शिजणार,
त्यामधून मनबुध्दी बळकट होणार,
पण काय माहिती नजर लागली कोणाची..?
अन् नाही वाजली घंटा माझ्या शाळेची..!
शाळेत राष्ट्रगीताचे बोल खडकणार,
त्यातुन देशभक्ती प्रत्याकाची जागणार,
पण काय माहिती नजर लागली कोणाची..?
अन् नाही वाजली घंटा माझ्या शाळेची..!
प्रयोगशाळेतुन शास्त्रज्ञाचे प्रयोग जिंकणार,
एखाद्या लेखकाची लेखणी तापणार,
पण काय माहिती नजर लागली कोणाची..?
अन् नाही वाजली घंटा माझ्या शाळेची..!
शाळेवरती कोरोनाचे ढग बरसले,
त्यावरती दुःखांची विज कोसळले,
पण काय माहिती नजर लागली कोणाची..?
अन् अजुनही नाही वाजली घंटा माझ्या त्या शाळेची..!
Comments
Post a Comment