कारण चहा पिणाऱ्यांचा आहे वेगळाच वर्ग.

बाहेर मुसळघार पाऊस बरसला,
त्याचवेळी व्हरांड्यात तुम्ही चहा घेतला,
नाही देणार हा सगळा आनंद तो स्वर्ग,
कारण चहा पिणाऱ्यांचा आहे वेगळाच वर्ग.

काम करुनी तुम्ही खुपच थकला,
आले व ईलायचीचा चहा तुम्ही चाखला,
नाही देणार हा सगळा आनंद तो स्वर्ग,
कारण चहा पिणाऱ्यांचा आहे वेगळाच वर्ग.

टायपिंग करुन खुप आकडले तुमचे बोट,
मसालेदार चहाला लावा तुमचे आता ओठ,
नाही देणार हा सगळा आनंद तो स्वर्ग,
कारण चहा पिणाऱ्यांचा आहे वेगळाच वर्ग.

जेव्हा घ्याल तुम्ही चहाचे घोट चार,
अटकेपार पळतील तेव्हा तुमचे विचार,
नाही देणार हा सगळा आनंद तो स्वर्ग,
कारण चहा पिणाऱ्यांचा आहे वेगळाच वर्ग.

आईच्या, बायकोच्या हाताचा घ्या तुम्ही चहा,
लेणावळ्यात पावसाळ्यामध्ये तो पिऊन तर पहा,
नाही देणार हा सगळा आनंद तो स्वर्ग,
कारण चहा पिणाऱ्यांचा आहे वेगळाच वर्ग.

Comments