आज नवीन पत्र लेखणाचे स्वरुप पाहिले,
‘सप्रेम नमस्कार विनंती विषेस’ हे वाक्यच हरवले,
त्यामधील शब्ददेखील गाळणीतून पाठवले,
आणि पत्र लेखणाचे संपुर्ण स्वरुप बदलले.
शिपाईच्या नोकरीसाठी सचिवास महोदय म्हटले,
कंपनीच्या तणावकारी मालकास आदरणीय लिहीले,
विषय मात्र वाटेल तसे लिहून फिरवले,
आणि पत्र लेखणाचे संपुर्ण स्वरुप बदलले.
लेखकाने आकर्षक ग्रंथ-कादंबरी लिहीले,
वाचकांनी पत्रातून लेखकाच्या ग्रंथांचे कौतुक केले,
आज ते पत्राचे काम ईमेल,जीमेल ने छिणले,
आणि पत्र लेखणाचे संपुर्ण स्वरुप बदलले.
पत्राच्या शेवटीला ‘आपला,तुमचा’ हा शब्द उत्साहाने लिहीले,
त्यामधून ‘विश्वासु’ शब्द व विश्वास दोघांनाही संपवले,
स्वतः मात्र समाजालाच विश्वासघातक ठरले,
आणि पत्र लेखणाचे संपुर्ण स्वरुप बदलले.
आता मात्र पत्रांनाच लोकांनी विष हाताने पाजले,
शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना ‘ईमेल लेखण’ शिकवले,
साहित्यातुन वर्तमानामध्ये पत्रलेखण नाहीसे झाले,
भविष्यात पत्र व पत्रलेखण संग्रहालयात पाहिले.
Comments
Post a Comment