सकाळी लवकर ऊठ म्हणुन ती साद घालते,
जोरात काहीतरी बोलल्यास रागात ती पाहते,
थोडेसे जरी खरचटले तर डोळ्यात तीच्या अश्रु भरते,
अन् असे प्रेम करणारी फक्त आईच असते.
जेवन लवकर कर म्हणुन ती मागे लागते,
चपातीला तुप लाऊन जबरदस्तीने भरवते,
रागात देखील एक चपाती जास्त खाऊ घालते,
अन् असे प्रेम करणारी फक्त आईच असते.
अभ्यास कर म्हणुन स्वत: जवळ बसते,
संदीप माहेश्वरी पेक्षा जास्त प्रेत्साहन ती देते
प्रत्येक गोष्टींला सहकार्य ती मला करते,
अन् असे प्रेम करणारी फक्त आईच असते.
घरी असताना नुसती रागावत असते,
पाहुण्यांसमोर खुप कौतुक करते,
एकटेपणात तीच कायम सोबत राहते,
अन् असे प्रेम करणारी फक्त आईच असते.
‘दुरध्वनी चुलीत टाक’ असे नेहमी म्हणते,
आपल्या जडणघडणात तीचे आयुष्य हरवते,
प्रत्येक विजयामध्ये तीचा महत्वाचा भाग असते,
अन् असे प्रेम करणारी फक्त आईच असते.
प्रत्येका लेकरावर ती समान प्रेम करते,
ईश्वराचे रुप म्हणुन आपल्याला आई ती मिळते,
तीचे एकच रुप आपल्याला पाहायला मिळते,
अन् असे प्रेम करणारी फक्त आणि फक्त आईच असते.
Comments
Post a Comment