माझा तिरंगा

अवकाशात ताठ मानेने उभा आहे माझा तिरंगा,

सुर्यदेवते सारखा चमकतो माझा तिरंगा,

प्रकाशाच्या वेगाने धावतो माझा तिरंगा,

होय,अनन्यसाधारण आहे माझा तिरंगा.



हजारो शत्रुना धुळ चारतो माझा तिरंगा,

मित्रांना सदैव मदत करतो माझा तिरंगा,

जवानांच्यी ह्रदयावरती राज्या करतो माझा तिरंगा,

होय,अजरामर आहे माझा हा तिरंगा.



जगाला अहिंसेचे बोल शिकवतो माझा तिरंगा,

अन्यायाच्या विरुध्द आवाज उठवतो माझा तिरंगा,

फक्त सत्यचाच मान राखतो माझा तिरंगा,

होय,प्रत्येकाचा आदर्श आहे माझा हा तिरंगा.



शास्त्रज्ञांच्या ध्येयामध्ये असतो माझा तिरंगा,

साहित्यातुन देखील व्यक्त होती माझा तिरंगा,

शेतकऱ्यांसोबत काळ्या मातीत उभा आहे माझा तिरंगा,

होय,प्रत्येकाच्या ह्रदयात राज्य करतो माझा हा तिरंगा.



ध्येय प्राप्तीला सोबत असतो माझा तिरंगा,

हिमालयावरती कुच करतो माझा तिरंगा,

प्रत्येक स्पर्धेत जिंकते माझाच तिरंगा,

होय, स्वातंत्र्य आहे माझा हा मानाचा तिरंगा.





- शिवम सत्यवान मद्रेवार.

Comments

Post a Comment