आणि आकाशात तिरंगा फडकला.

महामारीने सगळीकडे धुमाकुळ माजवला,

अनेक नद्यांना पुर देखील आला,

यातून देखील त्यांच्यावरती विजय मिळवला,

आणि आकाशात तिरंगा फडकला.


सीमेवरती खुप आहाकार माजला,

जवानांचा केसरी रंग मातृभुमी वरती पडला,

आपल्या सेनेने देखील हल्ला बोलला,

आणि आकाशात तिरंगा फडकला.


फ्रांसमधून भारतात राफेल आला,

भारतीय वायुसेनेची ताकत त्याने वाढवीला,

यशस्वीरित्या त्याने अवकाशात भरारी घेतला,

आणि आकाशात तिरंगा फडकला.


ज्ञानाचा तेजस्वी सुर्य ईथे उगवला,

यशाचा दिवा ईखेच उज्वलीत झाला,

समानतेचा धडा संपुर्ण जगाला शिकवला,

आणि आकाशात तिरंगा फडकला.


चंद्रावरती आमचा तिरंगा पोहोचला,

मंगळावरती ताथ मानेने उभा राहिला,

सुर्यासारखा तेज त्याने धारण केला,

आणि अवकाशात तिरंगा फडकला.





- शिवम सत्यवान मद्रेवार.

Comments