आणि ते शिक्षक आहेत जे मला

 वर्गामध्ये ते प्रत्येकाला चुकीवरती रागावतात,

नवनवीन रस्त्यांवरती ते मला पळवतात,

जिथे मी चुकतो तेथेच ते अडवतात,

आणि ते शिक्षक आहेत जे मला घडवतात.


यशाच्या दिशेने ते मला चालावतात,

ताण-तणावामध्ये ते मला सावरतात,

जीवन कसे जगावे यांचे मला ते बोल देतात,

आणि ते शिक्षक आहेत जे मला शिकवतात.


अनेक हिरे ते स्वत: तयार करतात,

त्या हिऱ्यांना पैलु देखील स्वत:च पाडतात,

अशा अनेकांना सामान्याचे असामान्य बनवतात,

आणि ते शिक्षक आहेत जे मला वाढवतात.


सदैव पुस्तकाच्याच सानिध्यात ते राहतात,

माझ्या मनात ज्ञानांची मशाल पेटावतात,

त्या अज्ञानाचा अहंकार ते मिटवूनी टाकतात,

आणि ते शिक्षक आहेत जे माझी साथ देतात.


अनेक वाक्यांच्या विळख्यात मला ते अडकवतात,

विचार करण्यासाठी ते मला भाग पाडतात,

माझ्यासाठीच ते स्वत:चे आयुष्य खर्च करतात,

आणि ते शिक्षक आहेत जे मला जिंकवतात.


फळ्या-पुस्तकातुन नाही तर अनुभवातून  बोल देतात,

स्पर्धेत जिंकायचे नाही तर चमकायचे ते शिकवतात,

आवडत्या विद्यार्थ्यालाच खुप कमी शब्द बोलतात,

आणि ते एक शिक्षक आहेत जे हे सर्व करतात.




- ©️ Shivam Satywan Madrewar.

Comments