आणि मला हळुवारपणे ती नजर लावते.

खिडकीतुन ती हळूच पाहते,

पडद्यामागेच बसुन ती डोकावते,

मी पाहताच खिडकी ती आपटते,

आणि मला हळुवारपणे नजर ती लावते.


सायंकाळी गच्चीवरती ती येते,

माझ्या घराकडे पाहतच बसते,

मी येताच वाऱ्यासारखे पळून जाते,

आणि मला हळुवारपणे नजर ती लावते.


गल्लीमध्ये चालत चालत माझ्या घराकडे येते,

घराच्या कुंपणातून डोकाऊन पाहते,

मी बाहेर येताच विरुध्द दिशेला मुख करते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते. 


माझ्या आईला तासभर बोलत बसते,

माझ्या बहीणीसोबत बाजारात जाते,

मी बोलले तर प्रचंड रागाने पाहते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते.


मी काॅलेजला जाताना मागोमाग ती येते,

मी सावकाश चाललो तर रस्ताच बदलते,

वर्गामध्ये पण माझ्या कामाचे कौतुक करते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते.


माझ्या सर्व कविता आंतरजाळावरती वाचते,

अनामी तेथे खुप कौतुक पण करते,

नाटककारापेक्षा उत्तम नाटक करते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते.


©️ शिवम सत्यवान मद्रेवार.

Comments

Post a Comment