आणि मला देखील ॲानलाईन प्रेम झाले.

 त्या व्यक्तीसोबत तासनतास बोलायचे,

सायंकाळी त्या व्यक्तींची वाट पहायचे,

झोपताना देखील तिचा चेहरा आठवले,

आणि मला देखील ॲानलाईन प्रेम झाले.


सकाळी उठल्याबरोबर तीची प्रोफाईल पहायचे,

तिच्यासाठीच अनेक स्टेट्स मी ठेवायचे,

तीचा तो मोबाईल नंबर तोंड पाठ कले,

आणि मला देखील ॲानलाईन प्रेम झाले.


सायंकाळ प्रेमाचे वारे कानामधुन वाहायचे,

माझे प्रेमपत्र घेऊन तिच्या घराकडे पक्षी भरारी घ्यायचे,

तीला आठवून-आठवून माझे मन बेचैन झाले,

आणि मला देखील ॲानलाईन प्रेम झाले.


तीला मजेशीर विनोद मी पाठवायचे,

ती जेव्हा हसेल तेव्हा मी जोर-जोरात हसायचे,

तीने रिप्लाय नाही दिला म्हणुन माझे मन रडले,

आणि मला देखील ॲानलाईन प्रेम झाले.


तीचा आवाज ऐकल्यावरती माझे मन शांत व्हायचे,

सदैव तीचाच आवाज मला ऐकू वाटायचे,

तीने फोन नाही उचलला तर मी मोबाईल फोडले,

आणि मला देखील ॲानलाईन प्रेम झाले.


मला एक दिवस ॲानलाईन प्रेम झाले,

काही दिवसानंतर तीनेच मला ब्लाॅक केले,

मी तर स्वच्छ मनाने तीच्यावरती प्रेम केले,

त्यानंतर ॲानलाईन गोष्टीवरून माझा विश्वास उठले.



कवी -: शिवम सत्यवान मद्रेवार.

( ©️सर्व हक्क संपादीत )



Comments

Post a Comment