अनोखे व्यासपीठ.

 प्रत्येकामध्ये स्पर्धा निर्माण करतो,

कोणाला तो रात्रभर रडवतो,

तर कोणाचे स्वप्न तो पुर्ण करतो, 

आणि हे सर्व एक व्यासपीठ करतो.


गरीब-श्रीमंतांचा भेदभाव तो विसरतो,

जात-पात मुळ्यासोबत उखडून टाकतो,

मानवतेचे अनेक धडे तो शिकवतो,

आणि जीवन कसे जगावे हे व्यासपीठ शिकवतो.


आपापसातील क्रोध विसरण्यास भाग पाडतो,

सण-उत्सव नव्हे तर स्वातंत्र्य दिन साजरा करतो,

समाजामध्ये ज्ञानांची ज्योत तोच पोटावतो,

आणि एक उत्तम व्यासपीठ अंधश्रद्धा मिटवतो.


कोण त्यावरती आपले जीवन घडवतो,

त्यावर महामानव भ्रष्टाचार गाजवतो,

अन्यायाला तो निमंत्रणाने  बोलावतो,

आणि हे सर्व एक व्यासपीठ निमुटपणे पाहतो.


अनेक शेतकरी त्यावरतीच आत्महत्या करतो,

प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना पाहतो,

खऱ्या युध्दामध्ये रक्ताच्या पाऊस बरसतो,

आणि हे सर्व एक व्यासपीठ असाह्यपणे सहन करतो.


राजकारणी माणुस त्यावरती येतो,

विरोधकांवरती टिकेवर टिका करतो,

त्याच व्यासपीठाला नंतर अपशब्द वापरतो,

आणि एक व्यासपीठ हे सर्व ऐकून रात्री रडतो.


कलाकारांना तो नेहमी मदत करतो,

साहित्य व संस्कृतीला तो वाव देतो,

आपला इतिहास तो अभिमानाने मांडतो,

आणि हे सर्व काही एक व्यासपीठच करतो.


विजेता त्याच्या पायापडूनच पुरस्कार घेतो,

हा कवी त्याच्यावरतीच अनेक काव्य रचतो,

नाटककार त्याला स्वत:चा देव मानतो,

आणि एक व्यासपीठ खरा साहित्याकार घडवतो.


भुतकाळाच्या सर्व चुका तो मोठ्याने सांगतो,

भविष्यातील संकटांची पुर्वसुचना तोच देतो,

वेळे सोबतच वेळेच्या वेगाने तो धावतो,

आणि हे सर्व उत्तम व्यासपीठच करतो.


कधीतरी-कोढेतरी असे व्यासपीठ मी पाहतो,

तिथे प्रत्येक नाटककार त्याच्या नाटकात हरवतो,

कोण त्या नाटकातून लवकर बाहेर येतो तर कोण शेवट पर्यंत टिकतो,

कारण जो व्यासपीठाला आदर देतो तोच ईथे चमकतो.


शब्दरचणा-:

शिवम सत्यवान मद्रेवार.


Comments