नमस्कार,
काल सकाळी एक घटना समोर आली, दिनांक ८ ॲाक्टोंबर दुपार पासून एक मराठी लेखीका शोभा देशपांडे एका सराफ दुकानाच्या बाहेर ठीय्या घेऊन बसल्या आहेत.सराफदुकानदार मराठी मध्ये बोलणेयास नकार दिला आणि लेखीका शोभा देशपांडेयांना अपमानास्पद वागणुक देऊन बाहेर काढले.
आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो,हो हे बरोबर आहे की परराज्यामधुन काही लोक व्यवसाय-पाण्यासाठी येतात.ठीक आहे येऊदेत त्यांना आमचा त्यास मुळीच विरोध नाहीये.गोष्ट अशी की आज मराठी भाषा संपुष्टात आली आहे. त्यास जबाबदार कोण? अरे परराज्यातील लोक येतात आमच्यावरतीच दबाव टाकतात आणि आम्ही निमुटपणे शांत बसून हिंदी बोलतो. अरे मराठी माणुस आहेस तू...! हिमालयावरती संकट आले तेव्हा सह्याद्री धावून गेला होता हे विसरतां कामा नये. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि ती मुंबई देखील महाराष्ट्राची व मराठी माणसांचीच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिल्लीवरती हिंदी लोकांनी राज्य केलेच नाही, पण मराठी माणसाने दिल्ली वरती भगवा फडकला होता हे विसरतां कामां नये.
अरे मराठी माणसां आता तरी जागा हो,
सुरेश भट्टांनी म्हटले आहे,
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंत जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय माणतो मराठी.
अहो मराठी ही फक्त एक भाषा नाहीये, ती आमची आई आहे. जेव्हा आम्ही जन्मलो होतो, तेव्हा पहिला शब्द आमच्या जीभावरून ‘आई’ आला होता, परंतु आता लोक ईतके आधूनिक झाले आहेत की स्वत: मराठी शिकून देखील आपल्या मुलाला ‘आई’ नव्हे तर ‘मॅाम’ म्हणण्यास भाग पाडतात. अरे तुम्ही या जगामधील कोणतीही भाषा बोला, ती हिंदी असूदे वा इंग्रजी, परंतु खऱ्या भाव-भावना मात्र फक्त मराठीतूनच आपल्याला समजतात. आम्ही लहाण असताना ‘निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गं बाई चंद्र झोपला’ हे अंगांई गीत एकून झोपायचो, परंतु आता
Twinkle twinkle little star हे गाणे एकूणच आम्ही लहाणांणा झोपावतोय....!
मराठी भाषा कित पट समृध्द आहे हे आपल्याला माहितच आहे. तरी सुध्दा मराठी शाळेमध्ये शिकलेले पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजीच्या शाळेत पाठवतात हे पाहून नवलच वाटते. त्या अर्धवट इंग्रजी शाळेमध्ये सुध्दा माझ्या मराठी मातृभाषेचा तास इंग्रजीमध्ये घेतात. इतकेच नव्हे तर मराठी भाषा शिकवणारा शिक्षक देखील मराठी नसतो. आणि आपण हे सर्व काही निमुटपणे सहण करतो...?
ह्या सर्व गोष्टींसाठी जबाबदार कोण?
परप्रांतीय लोक का हे सर्व निमूटपणे सहण करणारे मराठी भाषीय लोक. गुजराती, मारवाडी, तमीळ, तेलूगू भाषीक लोक येतात; आणि आम्ही मराठी भाषा सोडुन त्याच्या हिंदी, तमिळ, तेलूगु, कन्नड या भाषा बोलतो. मुंबई मध्ये परप्रांतीय लोक येतात आणि स्वत: चे हक्क दाखवतात. जेव्हा आम्ही म्हणतो, मुंबई आमची तर तेव्हा आम्हालाच ते म्हणतात,
मुंबई तुमची तर भांडी घासा आमची,
ईथुन पुढे हे आजिबात चालणार नाही,हा महाराष्ट्र आहे आणि ईथे फक्त आणि फक्त मराठीत बोलावी लागणार.
आणि हा
मुंबई पण आमचीच आणि भांडी पण घासा आमची.
शेवटी मी येवढेच बोलेन, मराठी ही मातृभाषा हे दाखविण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी सोशल मिडीयावरती स्टेट्स नकोत, दररोज मराठी राज्यभाषा दिन साजरा करा,संपुर्ण दिवस मराठीमध्येच बोला.
मराठी भाषेला जपण्याचे व वाढवण्येचे कार्य फक्त कवी, लेखक, साहित्यकार, मराठी अध्यापकांनी नाही घेतले. मराठी भाषा त्या प्रत्येक व्यक्तीने जपली व वाढवली पाहीजे ज्याची मातृभाषा मराठी आहे.
बस्स पुरे झाले आता.
येणाऱ्या पिढीस मराठी बोलताना पहायचे आहे की हिंदी, इंग्रजी यापुढील सर्व निर्णय तुमचा आहे.
जय महाराष्ट्र!
जय मराठी!
धन्यवाद!
लेखक - शिवम सत्यवान मद्रेवार.
खूप छान आहे लेख👌👌👌
ReplyDeleteअगदी बरोबर ;खूप छान लेख!!👍👌👌
ReplyDeleteअतिशय उत्तम
ReplyDeleteMast
ReplyDeleteएकदम बरोबर लिहिलं आहे तुम्ही. जर इंग्रजी माध्यम शाळेत मराठीची नीट शिकवण होत नसेल तर पालकांनी स्वतःहून मुलांना मराठीची शिकवण दिली पाहिजे. ह्या मराठा साम्राज्याचा इतिहास, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मुलांपर्यंत, येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे.
ReplyDeleteएकदम बरोबर लिहिलं आहे तुम्ही. जर इंग्रजी माध्यम शाळेत मराठीची नीट शिकवण होत नसेल तर पालकांनी स्वतःहून मुलांना मराठीची शिकवण दिली पाहिजे. ह्या मराठा साम्राज्याचा इतिहास, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मुलांपर्यंत, येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे.
ReplyDeleteShivam, fine blog
ReplyDeleteखूप चांगली सुंदर
ReplyDeleteNice
ReplyDeleteकेंद्र सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे ते जर लवकरात लवकर अमलात आणले तर कदाचित मराठी भाषिक अधिक संख्या तयार होईल.मुंबई मराठी माणसाची आहे मग का आम्ही एखाद्याची भांडी घसवी. परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन मराठी माणसावर राज्य करू इच्छिते तर ते योग्य नाही.ठीक आहे असं म्हटलं जातं की सर्वांना देशात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आहे,पण असं ही नाही की तुम्ही एकाद्याचा हक्क हिरावून घ्या . तुम्ही सबोवतीच्या मातृ भाषेचा अवश्य आदर करा.
ReplyDeleteअप्रतिम लेख लिहिला आहे.मराठी भाषेवरचे प्रेम
ReplyDeleteएका एका शब्दात जाणवते. सत्य परिस्थिती
मांडलीत .अप्रतिम लेखन
खूप छान
ReplyDeleteNice
ReplyDelete❤❤😍😍😍😍
ReplyDeleteKhup chan 👍🏻
ReplyDelete😍👌👌
ReplyDelete😍😍
ReplyDeleteSuperb 👌😍
ReplyDeleteVery noice 😊😍
ReplyDeleteएकदम बरोबर लिहिलं आहे तुम्ही. जर इंग्रजी माध्यम शाळेत मराठीची नीट शिकवण होत नसेल तर पालकांनी स्वतःहून मुलांना मराठीची शिकवण दिली पाहिजे. ह्या मराठा साम्राज्याचा इतिहास, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मुलांपर्यंत, येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे.
ReplyDelete