डॅा. अब्दुल कलामांचे विचार व वास्तव.

आज १५ ॲाक्टोंबर, भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांची जयंती, सरांना त्यांच्या कार्याबद्दल विनम्र अभिवादन !!


संपुर्ण आयुष्य त्यांनी विद्यर्थ्यांना संबोधित करण्यात घालवले, इतकेच नव्हे तर जीवनाच्या शेवटच्या क्षणाही त्यांनी विद्यार्थ्यांनाच संबोधित करण्यात घालवले. सर कलाम आम्हाला नेहमी सांगत होते, छोटे स्वप्न पाहणे  हा सर्वात मोठा गुन्हा आहे; स्वप्न पहायचे असतील तर ते मोठे पहा, इतके मोठे स्वप्न पहा की संपुर्ण विश्व तुमच्याकडे आश्चर्ययाने पाहिले पाहिजे. सर कलाम म्हणतात, जीवनात कोणतीही कितीही विकट समस्या येऊदेत फक्त आपला पाहण्याच्या दृष्टीतून बदला; तेव्हाच त्या समस्येवरती तुम्ही विजय मिळवू शकता. यावरती त्यांनी एक उदाहरण देखील देले, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्व पक्षी त्या निर्सगाचा आनंद न घेता घरट्यांमध्ये बसून पाऊसापासून वाचतात. परंतु घार निर्सगाचा आनंद घेत त्या नभांपेक्षा वरच्या खरांमध्ये घिरक्या घेत त्या अल्लाददायक निर्सगाचा आनंद घेतो. या उदाहरणामध्ये इतर पक्षी व धार यांची समस्या एकच होती पण बघण्याचा दृश्टीकोन मात्र वेगळा होता. पाहण्याचा दृष्टीकोन बदला, समस्या आर्दश रित्या सोडवा.


सर कलामांनी ईग्नाइटेड माईंड म्हणजेच ‘प्रज्वलित मने’ या पुस्तकानधुन या नव्या पीढीच्या तरुनांची मने प्रज्वलित करण्याचे काम केले. इतकेच नव्हे ‘अग्नीपंख’ यापुस्तकामधून त्यांनी नव्या मनाला आकाशात उंच भराऱ्या घेण्यास शिकवले. सर कलामांबद्दल मी नव्हेच तर पुस्तके देखील जेवढे बोलतील तेवढे कमीच आहे. तसे पाहण्यास गेले तर ‘सर कलाम’ आणि या लेखकांची कलम’ या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका काण्याचा फरक आहे. आज भारतात नव्हेच तर जगाच्या पाठीवरीती कोठेही जावा, ज्या वक्तीच्या हातामध्ये कलम आहे त्या व्यक्तीच्या ह्रदयामध्ये कलामा व कलामांचे विचार दोघेही वास करतात. 


आज ह्या दिवशी मला अत्यंत खेद वाटते, ज्या कलामांनी विद्यार्थ्यासाठी घालवले तेच विद्यार्थी आज व्यसनाच्या आहारी जात आत आहेत. सर कलामांनी सांगितले होते व्यसन केले तर ‘मी बिघडलो’ असे नका म्हणू. व्यसन असे करा जे तुम्हाला ‘मी बी घडलो’ असे म्हणण्यास भाग पाडेल. व्यसन केले तर असे व्यसन करा की ध्येय जरी गाठले तरी सुद्धा व्यसन सुटायला नको. स्वप्नांसाठी व्यसन असे करा की रात्रीची झोप देखील निघुन जाईल. पण आमची तरूण पीढी स्वप्न तर पाहते, व्यसनही करते परंतु वेळ निघून गेल्यावरती. व्यसन करायचे असेल तर स्वप्न मागे लागण्याचे, पुस्तके वाचण्याचे, नवनवीन गोष्टी शिकण्याचे करा.


सर कलाम म्हटले होते, मी जेव्हा ह्या धरती वरती शेवटची श्वास घेईन तेव्हा फक्त अर्धा तास शोक व्यक्त करा आणि त्या दिवशी देशासाठी नव्हे तर माझ्यासाठी १ तास जास्त करा. परंतु आम्ही काय केले ही सांगणाची मुळाच गरज नाही. सर कलामांनी आम्हाला इतके काही ज्ञान दिले, ध्येय प्रत्प करण्याच्या अनेक गुरूकिल्ल्या दिल्या. तरी सुध्दा त्यांचे अनेक विचार आम्ही २७ जुलै व १५ ॲाक्टोंबर रोजी स्टेट्स ला ठेवतो. अरे सर कलामांचे विचार स्टेट्सला नकोत, ते दररोज आचरणात आणा, सर कलामांना आनंद होईल. सर कलामांच्या जयंती निमित्त आम्ही ‘वाचन प्रेरणा दिन’ सुरू केला. काही मराठी शाळेंमध्ये तो साजरा देखील केला जातो, परंतु काही शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जात नाही. फक्त १५ ॲाक्टोंबर रोजीच ‘वाचन प्रेरणा दिन’ आहे म्हणूनच काही फोटोंसाठी पुस्तके वाचायची का जीवन समृध्द करण्यासाठी पुस्तके वाचायची हे आम्हाला अजुनही नाही समजले. शाळेच्या वाजनालयामध्ये पुस्तके फक्त ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त नाही ठेवले हे त्या विद्यार्थ्यांना समजले पाहिचे. 


डॅां.ए.पी.जे. अब्दुल कलामांनी कोणाता ग्रुप जॅाईन केला नव्हता, ते एकटेच निघाले होते ध्येयाच्या वाटेवर आणि त्यांनी ध्येय प्रप्त केले.  ध्येय प्रप्त करा आणि विजय मिळवा .शेवटी मी एवढेच प्रत्येकाला सांगेन, डॅा. ए.पी.जे. अब्दुल कलामांची जयंती आहे म्हणून त्यांचे विचार स्टेट्सला नकोत ते आचरणात आना. इतकेच नव्हे तर १५ ॲाक्टोबर आहे म्हाणून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करू नका. रोजच पुस्तके वाचा, जे वाचण्यास मिळते ते वाचा; ज्ञान संग्रह करा. 


आपल्याला हा १५ ॲाक्टोंबर ‘वाचण प्रेरणा दिन’ दिवशी नवनविन पुस्तक वाचण्यास मिळो तसेच इथून पुढे दररोज नवनविन शिकण्यास मिळो अशी आशा करतो.


धन्यवाद!




लेखक - शिवम सत्यवान मद्रेवार.  

Comments

  1. छान संकल्पना!!👌👌 खरं आहे फक्त एक दिवस कलामांची जयंती आहे म्हणून वाचन न करता दररोज वाचन केलं पाहिजे .

    ReplyDelete

Post a Comment