सकाळी-सकाळी आंघोळ करताना ती आठवते,
कधी-कधी कागद व लेखणी घेऊन जावे असे वाटते,
दुःख असो वा ते सुख ती नेहमी सोबत राहते,
हे छंद आहे की वेड जी माझी झोप उडवते.
त्या कागदांच वास नाकामध्ये आजही दरमळतो,
ऊन-पाऊसातही तो आम्हालाच शिकवतो,
वैशिष्ट्य असे की शांत बसण्यास भाग्य पाडते,
हे छंद की वेड जी आमचे जीवन घडवते.
रक्त जमीनीवरती न सांडतां युध्द तो करतो,
अहिंसेने देखील सर्व काही तो मिटवतो,
मेंदू सोबत नव्हे तर ह्या ह्रदयासोबत नाते जोडतो,
हे छंद की वेड जे आम्हाला तो लिहिण्यास भाग पाडतो.
त्या भावनांना विरामचिन्हांमध्ये आम्ही बदलतो,
एखाद्या चारोळीमध्ये पुर्ण कवितेचा बोध तो बसवतो,
क्रोध नव्हे तर प्रेम करण्यास तो जगवतो,
हे छंद की वेड जे आम्ही ह्या शब्दांसोबत खेळतो.
त्या एकट्या आभाळास आम्ही बोलतो,
निर्सगाचे दुःख नाटकातून जगासमोर आणतो,
फुलपाखराचा आनंद चारोळी मधुन व्यक्त करतो,
हे छंद की वेड जे आम्ही नेहमी एकटेच बोलतो.
रात्रीचा देखील आम्ही लांबलचक दिवस करतो,
सणवार न पाहता लिहीतो, लिहीतो व लिहीतच जातो,
भ्रष्टाचार, अन्यायास संपविन्याचा प्रयत्न करतो,
हे छंद की वेड जे आम्ही हे अनमोल साहित्य रचतो.
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Very nice poem👌👌😊🤗
ReplyDelete